बल्लारपूर प्रतिनिधी- दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी बल्लारपूर शहरातील प्रत्येक वार्ड मध्ये असलेले नाल्या साफ होत नसल्यामुळे नागरिकांना याचा भार सहन करावा लागत आहे व त्यामुळे मच्छर व इतर किडे जमा होऊन ते नागरिकांना बिमारी निमंत्रण ठरत आहे .त्यामुळे मलेरिया ,डेंगू ,हिवताप असे अनेक बिमाऱ्या नागरिकांना होत आहेत तसेच अनेक वार्डामध्ये दुर्गंधी असलेले ठिकाण व कुठे सांडपाणी असलेले ठिकाण साफ करण्यात यावे .जेणेकरून त्या ठिकाणी मच्छर तसेच अन्य दुर्गंध असलेले किडे जमा होऊ नये व त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे अनेक बिमाऱ्याना आमंत्रण होत आहे व नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे .तरी आपणास नम्र विनंती आहे की, त्वरित बल्लारपूर शहरातील प्रत्येक वार्डामध्ये नाल्या तसेच इतर दुर्गंध असलेले ठिकाण सांडपाणी असलेले ठिकाण साफ करण्यात यावे व आरोग्य मुक्त शहर करण्यात यावे .यामुळे बल्लारपूर शहरातील नागरिकांचा बळी जाणार नाही. व आरोग्य धोक्यात राहणार नाही.
त्याकरिता आपल्याकडे नम्र निवेदन सादर करण्यात येत आहे . निवेदन देताना सत्यभामाताई भाले जिल्हा सल्लागार वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपूर, अभिलाष चूनारकर तालुका अध्यक्ष युवा आघाडी, रेखाताई पागडे शहराध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, उमेश कडू, राकेश पेटकर, दुरेस तेलंग , प्रभुदास देवगडे, प्रज्ञाताई नमनकर, शशिकला नगराळे, संगीता साखरे, सुषमा उबरकर, जोशीला वाघाडे, सागर गेडाम, हे उपस्थित होते
जर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास व नागरिकांच्या जीवाशी खेळ झाल्यास , जर कोणाचा जीव गमावल्यास वंचित बहुजन महिला आघाडी नगरपरिषद बल्लारपूर येथे आंदोलन करण्यास सक्षम राहील.

