सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – ठाणे दिनांक- ०५ सप्टेंबर २०२४ जिल्हा परिषदे मार्फत देण्यात येणारा “जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२४-२५” सोहळा आज बी. जे हायस्कूल येथे पार पडला. शिक्षकदिनाचे औचित्य साधून १५ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून मागील दोन वर्षांतील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने शिक्षकांचादेखील सन्मान करण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहोत. शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी आपण दिशा प्रोजेक्ट, एफ. एल. एन, वोपा टूल असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना उंचावर घेऊन जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानांची जोड घेऊन आपले उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोलाचं योगदान शिक्षकांनी द्यावे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांना अभिनंदन करत कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना देखील शिक्षक दिनाच्या शुभेच्छा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या. शिक्षकांनी या शैक्षणिक वर्षात आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस वाचन, लेखन, संख्याज्ञान इ. दिशा प्रोजेक्टच्या स्तर निश्चितीनुसार असावी अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केली.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शिक्षक दिनाच्या सदिच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवताना शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान सोहळा ५ सप्टेंबर रोजी पार पाडतोय ही आनंदाची बाब आहे. आई-वडील, शिक्षक आयुष्यात सकारात्मक बदल करत ज्ञानदानाचे काम करत असतात अशा सर्व शिक्षकांना सदिच्छा, असे मार्गदर्शन उप मुख्य कार्यकारी (सामान्य प्रशासन विभाग) अविनाश फडतरे यांनी केले.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भातसई येथील विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योत पेटवणाऱ्या शिक्षकांसाठी गीत सादरीकरण केले. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने पुरस्कार निवडीचे निकषाच्या आधारे तीन वर्षांतील १५ शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आज पार पडला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षक म्हणून मोलाचं काम करणाऱ्या शिक्षकांमुळे तळागाळातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहतात, शिक्षणाची गोडी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्याना वाव मिळण्यास मदत होते. शालेय स्तरावर विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जोमाने काम करा, असे आवाहन प्रास्ताविक करताना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहितुले यांनी केले.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (योजना) भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) कुंदा पंडित, उपशिक्षणाधिकारी वैशाली हिरडे, सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी, मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त शिक्षक अनघा आनंद सोनकांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक म्हणून देश घडवण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शिक्षकांना सन्मान सोहळा म्हणजे कौतुकाची थाप आहे असे मनोगत व्यक्त केले.
विस्तार अधिकारी शिक्षण आशिष झुंजारराव यांनी उपस्थित सर्वाचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गंगाराम ढमके, राजश्री पाटील यांनी केले.
◆ जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक
सन २०२२-२३ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील सहा. शिक्षिका अनघा आनंद सोनकांबळे, भिवंडी तालुक्यातील मुख्याध्यापिका पुष्पलता काशिनाथ गायकवाड, कल्याण तालुक्यातील पदवीधर शिक्षक आत्माराम बाळाराम पागडे, मुरबाड तालुक्यातील पदवीधर शिक्षक अरुण विनायक गोडांबे, शहापूर तालुक्यातील सहा. शिक्षक डॉ. हरिश्चंद्र तुकाराम भोईर
सन २०२३-२४ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुचित्रा राजेंद्र सोनार, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक विलास अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक श्रद्धा सुनिल पवार, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अशोक महादू रोठे, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुधीर पुंडलिक भोईर
सन २०२४-२५ वर्षातील जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक – अबंरनाथ तालुका तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गणपत शंकर धुरी, भिवंडी तालुक्यातील प्राथमिक शिक्षक अर्चना अनंता पाटील, कल्याण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक चतूर महारू वाघ, मुरबाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक डॉ. प्रशांत तुकाराम माळी, शहापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक शेखर शिवराम घोडविंदे

