जेष्ठ साहित्यिक राम मेश्री यांच्या ४ पुस्तकांचे एकाचवेळी प्रकाशन सोहळा संपन्न

0
78

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज-सुप्रसिद्ध लेखक राम मेश्री यांच्या “योगीयांची पाऊले” सोन्याची द्वारका, रंगमहाल, आणि चौरंग या चार पुस्तकांचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
व्यासपीठावर डॉ जीवबा केळुसकर(माजी शिक्षणाधिकारी) अध्यक्ष लाभले श्रीनिवास नार्वेकर (जेष्ठ अभिनेते नाटककार) महेश काणेकर(ललीत लेखक) सुगत उथळे (अभिनेते ) दिपक कदम ( अभिनेते) डॉ खंडू माळवे (जेष्ठ साहित्यिक) सशिकांत सावंत (समाजसेवक पत्रकार) आयोजक कवी लेखक संपादक प्रकाशक संतोष सावंत उपस्थित होते कार्यक्रमासाठी बहुसंख्येने रसिकजन उपस्थित या कार्यक्रमात माणसाला जीवन जगण्यासाठी उर्जा देणारे सांस्कृतिक जीवन आवश्यक असल्याने भाषण करून चिमुरडी कन्या वय वर्षे आठ इ ३री कु उत्तरा मिलिंद मेश्री हीने व्यासपिठावरील मान्यवर तसेच उपस्थित रसिकजन यांना मंत्रमुग्ध केले अवघ्या महाराष्ट्रात भूषण वाटावे असे साहित्यिक राम मेश्री यांचे लेखन कार्य आहे! साहित्याच्या सर्वच प्रांतात अत्यंत प्रभावी पणाने भरारी घेण्याचे सामर्थ्य आपल्या लेखणीतून मा राम मेश्री यांनी सार्थ केले आहे मानवी जीवनाचा जीवन जगण्याची संघर्ष अत्यंत सुक्ष्म चिंतनशील सृजनशील आणि संवेदनशील मानाने राम मेश्री यांनी त्यांच्या साहित्यात अत्यंत कणवतेने ऋदयस्पर्षी तरल भावनेने चितारला आहे साथीला कोकणचा भव्यदिव्य निसर्ग यांच्या सहसंबंध अन्योनतेने, वेधकतेने टिपला आहे. कधी त्यांचे साहित्य प्रादेक्षितेचा पट साकारते तर कधी कोकणच्या ग्रामिण जीवनाचा हुंकार वेदना आक्रोश काळिज दुभंगून टाकते आजवर त्यांनी ३१ पुस्तकांचे लेखन केले असून त्यातील १८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत कौंडल चैलतीर, आलेल्या आठवणी, आणि अश्रू हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत आस्वाद स्पर्ष किणारा, दावा, या त्यांच्या ऋदयस्पर्षी अशा कांदबरी आहेत मिटलेकी कवाडे, मावळतीचे रंग, हे त्यांचे नावाजलेले ललीत लेख संग्रह आहेत आकाश पेलताना हा त्यांचा नभोवाणी नाट्य संग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे श्री राम मेश्री हे साहित्य विश्वातील ठक नामवंत आणि प्राथितयश साहित्य कौस्तुभ आहेत याततीळमात्र शंका नाही असे गौरवोदगार नामवंत लेखक कवी आणि मुंबई महानगर पालिका माजी शिक्षणाधिकारी डॉ जीवबा केळुसकर यांनी प्रकाशन समयी काढले.
रविवार दि. १सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी सायंकाळी ४वा डोंबिवली पुर्व येथील गणेश मंदिर संस्थान यांच्या विनायक हाॅल येथे सुत्रसंचालन मा पुजा काळे(आकाशवाणी) निवेदिका यांनी आपल्या वैभवशाली आवाजात राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here