सोनाली घाटगे उपसंपादक प्रबोधिनी न्युज – संतोष प्रकाशन आणि नवचैतन्य सा. वि. संस्था(रजि) डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने संतोष प्रकाशनाचे रौप्य महोत्सवी वर्ष व कवी संतोष सावंत संपादित सुबक आरती संग्रह २५ व्या आवृतीचे प्रकाशन त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध लेखक कवी राम मेश्री यांच्या एकाच वेळी ४पुस्तके “चौरंग”(काव्य गीत संग्रह)” रंगमहाल “(तीन अंकी नाटक)” सोनियांची पाऊले”(विभुती परिचय कथा)”सोन्याची द्वारका”(लोकनाट्य संग्रह) दि. १ संप्टेंबर २०२४गणपती मंदिर संस्थान विनायक हाॅल डोंबिवली या ठिकाणी आयोजित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा आमदार रविंद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ जीवबा केळुसकर(माजी शिक्षणाधिकारी, मनपा) मा श्रीनिवास नार्वेकर (सिने नाट्य अभिनेते) बाबुराव सिरसाट (बालसाहित्यक) सुनील खर्डीकर सशिकांत सावंत (समाजसेवक पत्रकार) दिक्षा चाळके, समिघा सावंत डॉ खं र माळवे-खरमा(जेष्ठ साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते) विषेश भुषण कडू(सिने, नाट्य, हास्यजत्रा अभिनेते) डॉ. महेश काणेकर(ललित लेखक) मा प्रकाश भोईर(जिल्हाअध्यक्ष मनसे) सुगत उथळे(नाटककार) कवी विलास देवळेकर, गायक घायाळकर, रेवती आळवे(बॅंक मॅनेजर) व इ मान्यवर उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या मान्यवरांना पुरस्कार देवून गौरवण्यात आले तसेच पुजा काळे (आकाशवाणी निवेदिका) सुत्रसंचालन केले संपादक संतोष सावंत यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

