प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – साहित्य दर्पण कला मंच नागपूर या समूहाच्या वतीने नभांगण लॉन्स वनवैभव कॉलनी समोर वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर नाशिक येथे साहित्य दर्पण कला मंच नागपूर या समूहाच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय कविसंमेलन दिनांक १८ मे २०२५ रोजी संपन्न होणार आहे.
सदर कवीसंमेलन वाल्मिक सोनवणे साहित्यिक दहिवड नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे तर या कविसंमेलनाचे उद्घाटक विनोद जाधव मुंबई हे असून सहउद्धाटक अशोक टेंभुर्णीकर नागपूर , सहउद्धघाटिका डॉ.अनिता बेंडाळे नाशिक,तर दुसरे सत्र रेखा भास्कर मालपुरे कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन पार पडणार आहे.
या कविसंमेलनाच्या स्वागताध्यक्षा तथा समूह संस्थापिका कल्पना टेंभुर्णीकर नागपूर,स्वागताध्यक्ष तथा समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके,आरमोरी जिल्हा गडचिरोली,समूह निरीक्षिका निता बागुल नाशिक ,समूह कार्याध्यक्ष मधुकर गोपनारायण नागपूर,समूह प्रशासक सीताराम नरके पुणे,समूह मार्गदर्शक डॉ.हरिश्चंद्र धिवार मुंबई यांनी साहित्यिकांनी अधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

