prabodhini news logo
Home ठळक बातम्या सट्टा अड्ड्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी यांची धाड; चार जण अटकेत

सट्टा अड्ड्यावर पोलीस उपविभागीय अधिकारी यांची धाड; चार जण अटकेत

0
164

डॉ. सुखदेव काटकर तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर दिनांक १/५/२०२५ च्या रात्री ठीक ११ वाजता शिवनगर परिसरात सटयाच्या अड्ड्यावर धाड घालण्यात आली .ही धाड एचडी ओ गोफने सर चा मार्गदर्शनात धाड घालण्यात आली. या कारवाईत चार लोकांना अटक करण्यात आली .अटक पैकी भूषण प्रकाश मोहनकर 28 राहणार तिलक नगर तुमसर जीवतराम सुदन हलमारे वय45 राहणार हसारा गाव. राम रतन प्रल्हाद अग्रवाल47 राहणार शिवनगर .शेखर उर्फ सोनू प्रल्हाद अग्रवाल 40 राहणार शिवनगर तुमसर. मुख्य सूत्रधार शेखर उर्फ सोनू अग्रवाल आहे .यांच्याकडून दोन लाखाचं मालमत्ता जप्त करण्यात आले. ह्यामध्ये लॅपटॉप .काही मोबाईल .काही मोटरसायकल असे आहे. तुमसर शहर मध्ये याआधीही सटा बाजारावर धाड घालण्यात आली .पण हा गोरख धंदा थांबण्याचा नाव घेत नाही आहे वेगवेगळे ठिकाणी हे अड्डे सुरू असतात आणि यावर पोलिसांची करडी नजर आहे या कारवाईमध्ये तुमसर पोलीस उपनिरीक्षक पंचबुधे हवालदार भांडेकर रवी आडे विक्रम अस्वले आणि गजानन ठाकरे उपस्थित होते पुढचे तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here