शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात सायबर सुरक्षावर कार्यक्रम संपन्न

0
84

प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर- स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे दि. 4 सप्टेंबर 2024 रोजी ‘सायबर गुन्हे आणि उपाययोजना’ या विषयावर विध्यार्थी आणि कर्मचारी यांच्या साठी मार्गदर्शन पर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विधी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या अध्यक्षते खाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. चंद्रपूर सायबर ब्रांच चे पोलीस अधिकारी मुजावर युसूफ अली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. मुजावर अली यांनी पॉवर पॉईंट च्या माध्यमातून सायबर गुन्हे, त्याची व्याप्ती, गुन्ह्याचे विविध प्रकार, कायद्या अंतर्गत त्यासाठी असलेली शिक्षा, आणि इंटरनेट चा वापर करतांना घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर मार्गदर्शन प्रदान केले. अली यांनी चंद्रपूर शहरात घडलेल्या अनेक सायबर गुन्ह्याचे दाखले देऊन आज च्या तरुण पिढीने सावधान राहण्याचे आवाहन देखील केले. कार्यक्रमाला रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. सरोज कुमार दत्ता, प्रा. डॉ. मनीषा आवळे, संगणक विभाग प्रमुख सुबोध मेश्राम यांची व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा चे संचालन व आभार प्रदर्शन ऍड. प्रिया पाटील यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वा नुसार दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी सायबर गुन्हे व उपाययोजना हा कार्यक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here