सिंदेवाहीत गोंडीयन आदिवासी समाजाचा भव्य मेळाव्याचे आयोजन

0
214

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची राहणार प्रमुख उपस्थिती

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

जनसेवा गोंडवाना पार्टी महाराष्ट्र प्रदेश तथा समस्त गोंडियन आदीवासी सामाजिक संघटना चंद्रपूर यांच्या वतीने गोंडियन आदीवासी समाजाचा भव्य मेळावा व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन दि. ६ सप्टेंबर २०२४ रोजी शुक्रवारी दुपारी १२ वाजता सिंदेवाही शहरातील सोमेश्वर मंदिर फटाका ग्राऊंडवर करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. तर अध्यक्षस्थानी जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचितराव सयाम हे असणार आहेत. यावेळी कार्यक्रमात चिमुर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ नामदेव किरसान यांचा सत्कार होणार आहे.
प्रमुख अतिथी म्हणून जनसेवा गोंडवाना पार्टी प्रदेशाध्यक्ष धीरज शेडमाके, जनसेवा गोंडवाना ब्रम्हपूरी विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद ऊईके, बंडु मडावी, माजी जि.प.सदस्या रुपा सुरपाम, माजी नगराध्यक्ष स्वप्ननील कावळे, सुनिल पेंदाम, काॅंग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, माजी जि.प.सदस्य खोजराम मरस्कोल्हे, जनार्दन गावळे, अमृत मडावी, माजी जि.प.सदस्य नयना गेडाम, नेताजी मेश्राम, प्रमोद बोरीकर यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here