चिमूर प्रतिनिधी- कालिदास तोडासे हे मागील दोन वर्षापासून जांभुळगाट सांजा मध्ये कार्यरत होते, तलाठी तोडासे हे अत्यंत मनमोकळे स्वभावाचे होते त्यांनी सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास न देता त्यांची कामे केली असल्याने ते सर्व जनतेला आपलेसे वाटत होते, त्यांची बदली ही कोरपणा तहसील मध्ये झाली असल्याने त्यांचा सत्कार व निरोप समारंभ कार्यक्रम जांभूळ घाट ग्रामपंचायतचे उपसरपंच राजेंद्र साठोने यांच्या द्वारा आयोजित करण्यात आला होता.
तलाठी तोडासे यांना त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून मांगलगावचे सरपंच प्रफुल कोलते, ग्रामपंचायत कोटगावचे सदस्य तथा पत्रकार उपक्षम रामटेके, ग्रामपंचायत सदस्य जांभुळ घाट अमोल गजभिये यांनी तलाठी तोडासे यांना ग्रामगीता आणि शाल व त्रीफळ देऊन सत्कार केला.
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला विनोद राऊत, उमाजी निवटे, रामेश्वर सावसाकडे, व जांभुळ घाट चे बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

