prabodhini news logo
Home कविता आजची कविता – आई

आजची कविता – आई

0
292

आई तुझे उपकार ध्यानात येई
पाळना हाताचा दिप नयणांचा
त्रास तु सोशिला नवु महीने नवु
दिवसाचा

गायलीस तु अंगाई
रडु येते मज आई
आई तुझे उपकार ध्यानात येई

जन्मोजन्मी आई
तुच मला मिळावी
हेच मागणं करतो
मी देवापायी

आई तुझे उपकार ध्यानात येई
आई बाबा जन्म
तुम्ही मला दिलात
माझे जिवन साकारलात

आईबाबा
माझ्यासाठी तुम्ही
झिजझिजलात
माझ्यासाठी तूम्ही
कधीच नाही हरलात

काबाडकष्ट केलात
ऊन्हातानात
काळी आई शेतामंदी
राबराबलात

आईबाबा
मला तुम्ही
साडीच्या पदराची
करून झोळीत मला
जोजवलात
साडीचा झोळीचा झोका
झाडाला टांगलात

आईबाबा
ऊण वारा पाऊस
माझ्यासाठी
तुम्ही अंगावर झेललात

आई तुझे दुध
अमृताहुन गोड
नाही आई तुझ्या
मायेला तोडमोड

आईबाबा
तुम्ही आहात
आत्मरूपी
आईविन बाबाचां संसार
आईबाबा विना अधुर

आईबाबा विन हे जगणं
आहेचं सुनसान
आईबाबा तुम्हा मुळेच
मिळाले आम्हास
बालपण बालपण
आईबाबा तुम्हीच
मायेचा सागर
आईबाबा तुमची माया

अपरंपार अपरंपार आई

आईबाबा
तुमचा मायेचा आशिर्वाद
आमुच्या डोक्यावर हात

आईबाबा
तुम्ही माझ्या
हृदयात

वंदना नागणे शिंदे
मंगळवेढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here