शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम- कारंजा : महायुती मधील भाजपा पक्ष सर्वात शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जात असून,प्राप्त माहिती प्रमाणे आमच्या निरीक्षणानुसार,कारंजा मानोरा व ग्रामिण भागातील मतदारांकडून महायुतीमध्ये सर्वात जास्त पहिली पसंती भाजपा आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे यांचे सुपूत्र ॲड.ज्ञायक पाटणी यांना दिली जात आहे.भाजपाचे आमदार स्व.राजेंद्र पाटणी हे गेल्या दशकातील आपल्या कार्यकाळात केवळ कारंजा मानोरा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्हा व वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावखेडे मोहल्ल्यातील समाजातून भाजपाचे संघटन मजबूत करण्यात यशस्वी झालेले होते.त्यामुळे आज त्यांच्या पश्चातही त्यांना व त्यांचे नंतर त्यांच्या मुलाला ॲड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांना मानणारा खूप मोठा मतदार वर्ग येथे तयार झालेला आहे.शिवाय गेल्या दोन वर्षात पाटणी यांच्या कामाच्या धडाक्यामुळे बहुतांश शहर, तालुक्यातील नगरविकास आणि ग्राम विकासाची कामे पूर्णत्वाला जाऊन सर्वच गावखेड्यातील – तालुक्याला जोडणारी रस्ते, पांदनरस्ते,नाली,सामाजिक सभागृहाची कामे पूर्णत्वाला गेलेले असल्याने व स्व.राजेंद्र पाटणी यांच्या पश्चात त्यांच्या मुलाने ॲड.ज्ञायक पाटणी यांनी कारंजा व मानोरा तालुक्यातील लोकांशी दांडगा संपर्क ठेवून व लोकांची अडली नडली कामे पूर्ण करण्याचा झपाटाच लावल्याने त्यांनी मतदार संघात स्वतःचा खूप मोठा जनसमुदाय तयार केल्याचे ठळकपणे दिसून येत आहे.त्यामुळे भाजपा पक्षश्रेष्ठींकडे सुद्धा ॲड.ज्ञायक पाटणी यांच्या बद्दल सकारात्मक निरीक्षण नोंदवीले गेल्याची माहिती विश्वसनिय सुत्राकडून मिळत आहे.त्यामुळे इतर इच्छुकांचा मात्र हिरमोड होणार आहे.मात्र भाजपा पक्ष शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखल्या जात असून या पक्षात पक्षश्रेष्ठींचा आदेश हा अंतिम आदेश मानल्या जात असतो. आणि म्हणूनच इतर इच्छुकांना पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरसावंद्य मानून महायुतीच्या उमेद्वाराला निवडून आणण्यासाठी बंडखोरी न करता, इमाने इतबारे काम करावे लागणार आहे.मात्र त्या बदल्यात इतर भाजपापक्षाच्या इच्छुकांना आणि घटक पक्षातील पुढाऱ्यांना सुद्धा भविष्यात विधानपरिषद,महामंडळाची दारे उघडी असणार असून त्यांच्यावर विश्वास ठेवून पक्ष त्यांना सत्तेत सामावून घेणार असल्याचे वृत्त आमच्या हाती आले आहे. त्यामुळे एकंदरीत मिळालेल्या माहितीवरून घटक पक्षातील इच्छुकांनी व स्वकियांनी महायुती एकत्र ठेवण्यासाठी इमाने इतबारे ॲड.ज्ञायक पाटणी यांना सहकार्य केल्यास कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघात महायुतीचा विजय होणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

