prabodhini news logo
Home चंद्रपूर मेंडकी येथे नळाद्वारे पिण्याचे पाणी दुषीत मिळतो

मेंडकी येथे नळाद्वारे पिण्याचे पाणी दुषीत मिळतो

0
113


रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी- मेंडकी येथे सन१९८९-९० पासून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांगलवाडी येथील फिल्टर प्लॅंट द्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा होत आहे. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कोणत्याही प्रकारचे पाण्याचे शुद्धीकरण होत नाही. व गढूळ पाणी दररोज नळाद्वारे पिण्याचे पाणी म्हणून मेंडकी येथील नागरिकांना पुरवठा होत असल्याचे लक्षात येताच ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ थानेश्वर पाटील कायरकर यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता वास्तव परिस्थिती पाहून वरिष्ठ कार्यालयास तक्रार दाखल केली आहे.
फिल्टर प्लॅंट मध्ये वापरायची रेती निकृष्ट दर्जाची आहे,आलमवडी चा वापर केला जातो वैनगंगा नदी पात्रातील उपसा केले पाणी फिल्टर न होताच पिण्यासाठी मेंडकी येथील नागरिकांना दररोज पुरवठा केला जात आहे.गावात नळाद्वारे गढूळ पिण्याचे पाणी मिळत असल्याने साथीच्या रोगाचे थैमान सुरू आहे.मेंडकी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठीचे कंत्राट ब्रम्हपुरी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अविनाश मस्के यांना असुन हेच “मोदी सरकारचे घर घर नल,और शुद्ध जल ” योजना आहे काय असा प्रश्न मेंडकी येथील नागरिकांना होत आहे.संंबधीत पाणीपुरवठा अधिकारी व कंत्राटदारा वर उचीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ थानेश्वर पाटील कायरकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here