कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे युवा शेतकरी गणेश मंडळातर्फे 12 वर्षांपासून गणपतीची स्थापना करून विविध समाजोपयोगी कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. यंदाही युवा शेतकरी गणेश मंडळ रत्नापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.10 सटेंबर ला रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिरात डॉ. मिलिंद झाडे, रूपेश घूमे, अमोल रामटेके व त्यांची चमु रक्तसंकलन करण्यासाठी हजर होती. या शिबिरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले.
42 लोकांचे रक्तसंकलन करुन जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथील रक्तपेढ़ीत पाठवण्यात आले. या रक्तदान शिबिरात मंडळच्या सदस्यांनी तसेच गावातील युवकांनी सहभाग नोंदविला. यासर्व कार्यक्रम उपक्रम साठी मंडळचे अध्यक्ष प्रविण लोखंडे, उपाध्यक्ष मंगेश पर्वते,सचिव आकाश बंसोड, कोषाध्यक्ष युवराज पर्वते,सहकोषाध्यक्ष मोतीराम पर्वते,संदीप डोंगरवार, नेताजी गहाणे, वासुदेव दडमल,गुरुदास रेपकवार ,कैलास तोंडफोड़े,शंकर लोखंडे आणि सर्व मंडळचे सदस्य उपस्थित होते.

