कवी पुनाजी कोटरंगे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान

0
95

सावली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – गडचिरोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र रत्नागिरी (भारत) यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, सत्कार समारंभ व राज्यस्तरीय कवीसंमेलन पार पाडला. यात पुनाजी कोटरंगे यांना साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यातील अनेक भागातून कवी साहित्यकांनी पुरस्कार व कवीसंमेलन यासाठी सहभाग नोंदविला होता त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील गायडोंगरी या छोट्याश्या गावातील युवा कवी पुनाजी नारायण कोटरंगे यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याची दखल घेत समूहाणे त्यांना साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरन्वित केले आहे.

समूहाचे संस्थापक मा. मनोज जाधव सर, समुहाच्या संस्थापिका आदरणीय भावना खोब्रागडे मॅडम, गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मानीय सोपानदेव म्हशाखेत्री सर तसेचं सचिव मा. प्रभाकर दुर्गे, संमेलन अध्यक्ष मंगेश जनबंधू यांचे पुनाजी कोटरंगे यांनी विशेष आभार माणले तर साहित्यक्षेत्रातील कवी मित्र विशाल मोहुर्ले, कुमारी अपेक्षा खोब्रागडे, सोनाली कोसे, प्रभाकर दुर्गे, तेजस्विनी बोरकर, किरण बोरुले, रेश्मा बावणे, प्रियंका ठाकरे, सचिन कोसोदे, काजल नंदरधने, भीमराव खोब्रागडे व मित्र परिवार, नातेवाईक आई, बाबा, भाऊ यांचेकडून कवी पुनाजी कोटरंगे यांचे सर्वदूर कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here