मौजा- सावरी (बिड) येथे सामाजिक सभागृह बांधकाम चे लोकार्पण सोहळा संपन्न
चिमूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज दिं.१७ सप्टेंबर २०२४ चिमुर:-माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते व आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते मुरपार येथील माँ मानिका देवी सभागृह बांधकाम (निधी- ३०लक्ष रू)चे भूमिपूजन मोठया उत्साहात संपन्न झाले.
तसेच माजी खासदार अशोक नेते व आमदार बंटी भांगडिया यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधी तुन सावरी (बिड) येथील सामाजिक सभागृह बांधकाम (निधी- १५लक्ष रू)चे लोकार्पण मोठया उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी जनतेशी सवांद साधतांना म्हणाले भाजपा हा विकासाभिमुख कामे करते.पण विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नसल्याने मतदारांमध्ये खोटानाटा अपप्रचार करून खोट बोलण्यात पटाईत आहे.केंद्र व राज्यात अनेक लोकोपयोगी योजना आहेत.आता नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आली.या योजनेत विरोधकांनी विरोध करत ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात सुद्धा गेले.ह्या योजनेद्वारे माझ्या महिला भगिनींना पंधराशे रुपये रोख रक्कम थेट बँकेत जमा झाले.यासाठी विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे. लोकसभेच्या निवडणूकित महिला भगिनींना खटाखट दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देऊ अस खोटंनाट आश्वासन महिलांना दिलं,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी संविधानाचा आदर सन्मान करतात.पण लोकसभेच्या निवडणुकित विरोधकांनी त्याच संविधानाचा वापर करून संविधान बदलविला जाईल असा मतदारांमध्ये खोटा अपप्रचार करून मतदारांची दिशाभूल केली.आगामी येणाऱ्या विधानसभेत अशा खोटया अपप्रचाराला बळी न पडता विकासाभिमुख कामे करणारे भाजपाचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त करतो.
आपल्याला चिमूर विधानसभेत एक चांगला व्यक्तिमत्व असा युवा नेतृत्व, विकासाभिमुख,रात्र दिवस सतत जनतेच्या सेवेत असणारा काम करणारा बंटीभाऊ सारखा गुरुदेव भक्त माणूस मिळाला याचा अभिमान आहे.पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्याची बंटी भाऊला संधी द्या. असा विश्वास आपल्याला व्यक्त करतो.आपण मला लोकसभेच्या निवडणूकीत दिलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्याबद्दल आभार मानतो.असे प्रतिपादन मुरपार व सावरी भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी खासदार नेते यांनी व्यक्त केले.
मुरपार व सावरी या गावी गुरुदेव भक्त असुन या गावात एकोप्याने गुणागोविंदाने राहतात.,याचा आनंद ही यावेळी केला. याप्रसंगी चिमुर या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार बंटी भांगडिया यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन यावेळी केले. मुरपार मध्ये संचालन अजहर शेख व प्रास्तविक सुधीर पोहनकर यांनी केले. तर सावरी येथे संचालन एकनाथ थुटे व प्रास्तविक सरपंच लोकेश रामटेके यांनी केले. यावेळी मुरपार व सावरी येथील भाजप चे नेते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

