प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, गडचिरोली आणि संकल्प फाऊंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने, सेतू वेलफेअर फाऊंडेशन, नागपूर शिक्षण संकल्प यात्रा, करियर मार्गदर्शन कार्यशाळा कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय,वासाळा ( ठाणेगांव ) तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे दिनांक १९ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केले होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मेश्राम,पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे, कु.सुनंदा गिरीपुंजे विषय साधन व्यक्ती गट साधन केंद्र आरमोरी ,कु. सोनाली कात्रटवार गट साधन केंद्र आरमोरी, श्रद्धा ठुसे संकल्प फाऊंडेशन गडचिरोली, निखिल मोटघरे संकल्प फाऊंडेशन गडचिरोली हे मार्गदर्शक म्हणून लाभले होते.
यावेळी प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.प्रमोद दिघोरे सर यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील मेश्राम यांनी थोडक्यात अनेक क्षेत्रात रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.त्याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
या एक दिवसीय कार्यशाळेत कु. श्रद्धा ठुसे संकल्प फाऊंडेशन गडचिरोली यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, समाजात सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.शिक्षणाच्या आधारे आपण आपले करियर बनवू शकतो.जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या मनात उच्च ध्येय ठेवून वाटचाल करावी. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्नशिल असावे. आपण आपल्या जीवनात मोठे दर्जेदार स्वप्न पहावे एवढेच नाही तर ते साकार होण्यासाठी त्याच प्रमाणात मेहनत करावी. आपण आपल्या जीवनात नेहमी आपल्या आई – वडिलांचा विश्वास संपादन केला पाहिजे.त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे.भारतीय संविधानात असलेल्या तरतुदी ह्या शासन स्तरावर राबविल्या जातात.तेव्हा या संधीचा पुरेपूर फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा.आपण इतरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यापेक्षा आपला स्वतःचा आदर्श समाजाने घ्यावा यासाठी आवश्यक असलेले गुण स्वतः आत्मसात केले पाहिजे.असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले.
या एक दिवसीय करियर मार्गदर्शन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना निखिल मोटघरे संकल्प फाऊंडेशन गडचिरोली यांनी सांगितले की, आपल्या समाजात आर्थिक तफावत आढळून येत असून पूर्वी वेठबिगारीची पद्धत आपल्याला दिसून येत होती.त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत असताना सांगितले की, शिक्षणाच्या अभावी माणूस हा जिवंतपणीच दुसऱ्याचा गुलाम होतो. शिक्षणाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची दारे खुली करून दिली आहेत याचा सर्व विद्यार्थिनी पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.त्यांनी पुढे असेही सांगितले की, अनेक विद्यापीठात असलेले अभ्यासक्रम आणि आपल्याला उच्च शिक्षण कोणत्या नामांकित विद्यापीठात घ्यावे तसेच अनेक क्षेत्रात रोजगाराच्या तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध असून विद्यार्थांना याच गोष्टीचे मार्गदर्शन मिळत नाही.अनेक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध असताना त्यांनी सांगितले की,एक आपण उत्तम निवेदक,वार्ताहर तसेच हॉटेल व्यवस्थापन , वकीलीचा अभ्यासक्रम पूर्ण करून आपण आपले करियर बनवू शकतो असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी इयत्ता दहावी ते बारावीचे सर्व विद्यार्थी हजर होते.
या कार्यशाळेत प्रा.मनोज आलबनकार, प्रा विनोद कुनघाडकर, हेमंत मोहितकर, बी. बी. कोटरंगे, चंद्रशेखर निकुरे, सचिन जांभूळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रमोद दिघोरे यांनी केले तर आभार प्रा.नानाजी रामटेके यांनी मानले.

