नाणे ता.धुळे येथे सभामंडाचे लोकार्पण
सतिष पवार जिल्हा प्रतिनिधी, धुळे ९५२७७९९३०४- धुळे – आज दि. २३/०९/२०२४ राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे राहिलेली विकासाची कामे पूर्ण करुन धुळे तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. अशी ग्वाही धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी दिली. नाणे ता.धुळे येथे झालेल्या विकास कामांच्या लोकार्पण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या आमदार निधीतून नाणे ता.धुळे भव्य सभामंडळाची उभारणी करण्यात आली आहे. या सभामंडपाचे आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना आ.कुणाल पाटील म्हणाले कि, धुळे तालुक्यात प्रत्येक गावात विकासाची कामे केली आहेत. गावात मुलभूत सुविधांसह रस्ते,सामाजिक सभागृह अशा कामांना गती दिली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सरकार स्थापन होणार असून प्रत्येक गावातील उर्वरीत कामे पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी जनतेने खंबीरपणे साथ द्यावी असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले. यावेळी बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, संजीव सोनवणे, खरेदी विक्रीचे संचालक पंढरीनाथ पाटील,ज्येष्ठ नेते जनार्दन देसले,रुपाभाऊ राजपूत, दगडू आढावे यांनी मनोगत व्यक्त केले. सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्याला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते भिमसिंग राजपूत, विक्रम महाजन, मधुकर पाटील, महादू गवळी,भाऊसाहेब बोरसे, शिवाजी बोरसे,विशेष कार्यअधिकारी प्रकाश पाटील, बाजार समितीचे संचालक रावसाहेब पाटील,संभाजी राजपूत, पप्पू भदाणे, युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष हर्षल साळुंके, दशरथ पाटील, अमोल राजपूत, महेंद्र राजपूत, संतोष राजपूत, राहूल माळी, संजीव राजपूत, महेंद्र राजपूत, भाऊसिंग ठाकरे, जयसिंग राजपूत, माजी सैनिक बुरसिंग राजपूत, किरण राजपूत, बहादूर राजपूत, रविंद्र देवरे, कोमलसिंग देवरे, सुरेश राजपूत, रावसाहेब देवरे, योगेश गिरासे, सुनिल देवरे, मुकेश देवरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण माळी यांनी केले.

