जगदीश वडजे जिल्हा प्रतिनिधी, नाशिक – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष, नाशिक जिल्हाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध साहित्यिक नवनाथ अर्जुन पा. गायकर यांना प्रतिभा साहित्य संघ अकोट, जि.अकोला (विदर्भ) आयोजीत “उत्सव पीक पाण्याचा ” उपक्रमातंर्गत राज्यस्तरीय कथा स्पर्धेस प्रथम पुरस्कार जाहिर झाला.
या पुरस्काराचा वितरण सोहळा नुकताच अकोट येथे संपन्न झाला आहे.
लेखक नवनाथ गायकर यांच्या जिमीन या कथेस प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.या कथेच्या माध्यमातुन जमिनीला काळी आई मानणारी पिढी अस्तंगत होत चालली असुन, जमिनी विका आणि दोन दिवस आलेल्या पैशावर मजा करा.मात्र त्या नंतर केवळ आत्महत्ये शिवाय पर्याय नाही असा संदेश देणारी ही कथा आजच्या चंगळवादी पिढीचं वास्तव पण तितकच भयाण चित्रण करते अशा शब्दात या स्पर्धेचे प्रमुख परिक्षक जेष्ठ कवी विजय सोसे (परतवाडा, अमरावती) यांनी कौतुक केले.
गायकर यांना जेष्ठ शेतकरी अभ्यासक प्रशांत गावडे, अँड. गजानन पुंडकर, गोपाळ कोल्हे, प्रतिभा साहित्य संघ संस्थापक अध्यक्ष विठ्ठल दादा कुलट आदी मान्यवराचें हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल, श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतानां कवी विठ्ठल दादा कुलट यांनी शेतकर्यानां नेहमीच संघर्ष करावा लागतो.तो अस्मानी असतो,सुलतानी असतो.आणि तरीही तो मोती पिकवतच असतो, आणि जगाला जगवतच असतो.या शेतकर्याची किंमत केव्हा कळेल ? त्याचे दैन्य केव्हा संपेल? असे व्यवस्थेला अनुत्तरीत करणारे सवाल त्यांनी केले.
स्पर्धेचे आयोजक तथा प्रतिभा साहित्य संघ अकोट तालुका अध्यक्ष, सुप्रसिद्ध युवा कवी विशाल कुलट यांनी शेती मातीचं साहित्य यायला हवं.शेतीचं, शेतकर्याचं दु;ख जगाला कळायला हवं.यावर मंथन व्हायला हवं.आणि राबणार्या शेतकर्याला सन्मान मिळायला हवा असं सांगत या स्पर्धा आयेजनामागचा हेतु स्पष्ट केला.
महाराष्ट्रासह परराज्यातुनही या स्पर्धेस साहित्य आले होते. तब्बल २८७ विक्रमी साहित्यीकानीं या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिभा साहित्य संघ अकोट चे तालुका अध्यक्ष विशाल कुलट, सचिव सागर तळेकर यांनी तर कवी संमेलनाचे सुत्रसंचलन कवी गजानन मते यांनी केले.
आभार विशाल कुलट यांनी मानले.
यावेळी महाराष्ट्र भरातुन मोठया संख्येने साहित्यीक उपस्थित होते.

