राज्यातल्या शिक्षकांवर व शिक्षण क्षेत्रात अन्याय सहन करून घेणार नाही :- आप युवा नेते सुमित हस्तक
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर – आज दिनांक 25/09/2024 रोजी आम आदमी पार्टी च्या वतीने, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
शिक्षकांच्या न्याय्य मागण्या मान्य होण्यासाठी आम आदमी पार्टीने सदैव ठाम भूमिका घेतली आहे. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन चा मुद्दा असो किंवा सरकारी शाळा मधे सुधारणा असो या साठी आम आदमी पार्टी ने प्रत्येक वेळी मुद्दा उचलला आहे. प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविणे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण होणे ही केवळ शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीनेच नव्हे तर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण आहे. या आंदोलनाद्वारे शिक्षकांनी मांडलेल्या मागण्या, जसे की कंत्राटी करण पद्धत रद्द करण्यात यावे, जुनी पेन्शन सुविधा लागू करने, तांत्रिक सुविधांचा विकास, शिक्षकांचे नियमितीकरण, आणि अन्य शैक्षणिक सुधारणा तात्काळ मान्य करण्यात याव्यात, असा ठाम आग्रह आम आदमी पार्टीने व्यक्त केला आहे.
युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी यावेळी शिक्षकांच्या मागण्यांना पूर्ण समर्थन दिले असून, त्यांचे आंदोलन न्याय्य असून सरकारने त्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अशी मागणी केली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी दिलेल्या योगदानाची कदर केली जावी, असेही त्यांनी सांगितले.
आंदोलनाच्या समर्थनार्थ आम आदमी पार्टीने चंद्रपूर जिल्ह्यात विविध स्तरांवर काम करण्याचे आश्वासन दिले असून, शिक्षकांच्या हक्कासाठी लढण्यासाठी पार्टी सदैव तयार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीत आम आदमी पार्टी चे वरिष्ठ नेते तथा माजी जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, नागेश्वर गंडलेवार, जिल्हा संघटनमंत्री भिवराज सोनी, जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज शेख, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महानगर महिला अध्यक्ष तब्बसूम शेख, संतोष बोपचे, सिकंदर सगोरे, रोहन गज्जेवार व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

