धुळे जिल्हा प्रतिनिधी सतिष पवार (९५२७७९९३०४) – धुळे आज दिनांक:- २६/०९/२०२४ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हिंदू-मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होवू लागल्या आहेत. यासंदर्भात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे देखील दाखल होत आहेत. परवा असाच एक गुन्हा आझाद नगर पोलिसांत दाखल होताच पोलिसांनी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरूणाला थेट पुण्यातून अटक केली. त्यामुळे वाचाळवीरांना चांगलाच दणका बसला आहे. शिवाय, पोलीस दलाकडून याविरोधात तीव्र मोहीम लवकरच छेडली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दोन धर्मात तेढ निर्माण होईल, अशा स्वरूपाचा मजकुर पोस्ट केला होता. याविरोधात देवपुरातील इस्लामपूरा येथील रहिवासी मोहम्मद नादीर जमील अहमद अन्सारी (२८) यांनी आझाद नगर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संशयित लक्ष्मण बैरागीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९,३५३/२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
एलसीबी, सायबर सेल आणि आझाद नगर पोलिसांची संयुक्त कारवाई- लक्ष्मण बैरागीविरूद्ध तक्रार येताच पोलीस लागलीच कामाला लागले होते. यासाठी एलसीबी, सायबर सेल आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे पीआय निवृत्ती पवार,एपीआय विजय ठाकूर आणि डीबी पथकाने संयुक्त कारवाई करत अगोदर लक्ष्मण उर्फ लखन गोपाल बैरागी (२२) याचा पत्ता शोधून काढला. तो शिंदखेडा तालुक्यातील जुने कोळदे येथील रहिवासी असून व सध्या पुण्यात वास्तव्यास असल्याचे पोलिसांना समजले, त्यानुसार पोलिसांनी थेट पुणे गाठत लक्ष्मण बैरागी याला जेरबंद केले, त्याला आज न्यायालयात उभे केले जाणार आहे.
तेढ निर्माण करणे टाळा – हल्ली सोशल मीडियावर विखारी मॅसेजस् पोस्ट करण्याचे प्रमाण चिंतनीयरित्या वाढले आहे. धार्मिक भावना दुखावूनही पोलिसांकडून अनेकदा आरोपी ताब्यात घेताना उशीर होतो.शिवाय, अशा गुन्ह्यात लवकर जामीन मिळतो सोशल मीडियाचा वापर काळजीपुर्वक करा -सर्वसामान्य नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही धार्मिक भावना भडकविणाऱ्या वादग्रस्त पोस्ट करू नका. यामुळे गंभीर गुन्हे दाखल होतात, त्यामुळे रेकॉर्ड खराब होतं. सदर गुन्ह्यातील आरोपी हा तरूण आहे, त्यामुळे त्याचे भवितव्य अंधकारमय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, तरूण मुलांनी तेढ निर्माण होईल अशा पोस्ट करू नये किंवा लाईक करू नये, शांतताप्रिय धुळ्याची परिस्थिती ढासळू देवू नका, सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा. धनंजय पाटील, आझाद नगर पोलीस ठाणे यांनी असे आवाहन केले आहे. पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला थेट पुण्यातून अटक करण्याची किमया साधली.त्यामुळे इतर भरकटलेल्या तरूणांना योग्य तो इशारा मिळाला आहे.
गुन्ह्याचे स्वरूप असे- फेसबुकवर लक्ष्मण बैरागी नामक तरूणाने आक्षेपार्ह पोस्ट टाकली.

