जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित

0
61

पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात लसीकरण करून घ्यावे असे आवाहन

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे

ठाणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्कपशुसंवर्धन विभाग अंतर्गत जागतिक रेबीज दिनानिमित्त अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुवैद्यकीय दवाखान्यात दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १:३० वाजेपर्यंत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

प्रादेशिक सह आयुक्त पशुसंवर्धन मुंबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ६९ पशुवैद्यकीय दवाखान्यात शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

अँटी रेबीज लसीकरण शिबीर अंतर्गत ठाणे जिल्ह्यात एकूण ३ हजार ८०० एवढा लस साठा पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here