सर्व समाजांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय – खा. प्रतिभा धानोरकर

0
104

भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा.

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – मी खासदार म्हणून सर्वच समाजाच्या, जातीच्या व धर्माच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कोरपना तालुक्यातील लखमापूर येथे आयोजित भोई समाजाच्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी व्यक्त केले.

2024 च्या निवडणूकीत मला सर्वच समाजाच्या नागरीकांनी भरभरुन मत रुपी आर्शिवाद दिला. विशेषतः 2019 व 2024 च्या दोन्ही निवडणूकीत राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी दाखविलेल्या प्रेमासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील. मी प्रत्येक धर्माच्या जातीच्या नागरीकांसाठी सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहे, असे मत देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी लखमापूर येथे आदिवासी समाजाचे दैवत असणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर आमदार सुभाष धोटे, राजुरा नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांचा लखमापूर वासीयांतर्फे सत्कार देखील करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here