प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दोन दिवसीय चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर

0
78

प्रमुख पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

चंद्रपूर प्रतिनिधी, प्रबोधिनी न्युज – आज दि. २८ सप्टेंबर 2024 भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे रविवार दि. २९ आणि सोमवार ३० सप्टेंबेर २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत.

रविवार दि. २९ सप्टेंबरचे कार्यक्रम 

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राजुरा येथून ते प्रवासाला सुरुवात करणार आहेत. दुपारी ०४.०० वा. राजुरा येथील सम्राट हॉल येथे राजुरा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ०७.०० वा. चंद्रपूर शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हॉल, रामाडा तलाव रोड, जटपुरा गेट येथे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 
 
सोमवार दि. ३० सप्टेंबरचे कार्यक्रम

सकाळी ११.०० वा. नागभीड येथील भाजपा कार्यालयात चिमूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. दुपारी ०३.०० वा, बह्मपुरी येथील भाजपा कार्यालय आरमोरी रोड येथे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 
 
त्यांच्या दौऱ्यासाठी राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार रामदास आंबटकर, आ. बंटी भांगडिया, अतुल देशकर, चंद्रपूर शहराध्यक्ष राहुल पावडे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, देवराव भोंगळे यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here