जातीवाचक शिवीगाळ करण्याऱ्यावर त्वरीत अटक कर
अन्यथा पक्षाचे वतिने 30 सप्टें.रोजी वडकी पो.स्टे.वर लाल वादळ धडकणार
राळेगाव प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क– भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राळेगाव तालुका सचिव कॉ.प्रविण आडे हे आष्टोना गावचे रहीवासी आहेत. ते पक्षाचे व आदीवासी समाजाचे युवा नेत्रुत्व असुन त्यांचे आष्टोनासह वडकी जि.प. मतदारसंघात राजकिय, सामाजिक कार्य जोमाने सुरू आहे.ते ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, आदीवासींच्या प्रश्नाला घेऊन सतत आंदोलने करीत असतात.नुकतेच त्यांनी आष्टोना येथील रोड,नाली व इतर समस्यांना घेऊन सहकारयासह चार दिवस आमरण उपोषण आंदोलन केले होते.व समस्या मार्गी लावल्या होत्या.त्यामुळे विरोधकांना ते खुपत होते.अशातच गावात ग्रामसभा असतांना प्रविण आणी ग्रामवासी ग्रामसमस्यावर चर्चा करीत असतांना आठच्या संख्येत असलेल्या विरोधकांनी अचानक हमला केला, जातीवाचक शिवीगाळ करून जिवघेणा हमला केला परंतु घटनास्थळी पोलीसांनी येऊन प्रविणला सुरक्षित केले.या घटनेच्या विरोधात प्रविणने आपल्या पत्निसह वडकी पो.स्टे गाठुन गैरअर्जदाराविरोधात तक्रार दाखल केली. पोलीसांनी गैरअर्जदारावर विविध कलमांतर्गत व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला.काही दिवस उलटले तरीही पोलीसांनी गैरअर्जदारांना पकडले नाही.येणारया काळात प्रविणला गैरअर्जदाराकडुन घातपाताचा धोका असल्याने गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्यात यावे अन्यथा पक्षाचे वतिने तिव्र आंदोलन केल्या जाईल. या आशयाचे निवेदन यवतमाळ येथे कॉ.अनिल हेपट, जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे, सहसचिव कॉ.बंडु गोलर,संजय भालेराव,हिम्मत पाटमासे,प्रविण आडे व गावकरयांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दिले.तरीही उपविभागीय पोलीस अधिकारी आरोपींना पाठीशी घालत आहे. त्यामुळे 30 सप्टें.रोजी भाकपच्या वतिने वडकी पो.स्टे.वर प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पो.स्टे.वर धडकणारया लाल वादळात राळेगाव तालुक्यातील जनतेने हजारोंच्या सहभागी व्हावे असे आवाहन भाकप तालुका कौंसिलने केले आहे.

