मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे प्रयाण
प्रणय बसेशंकर तालुका प्रतिनिधी,यवतमाळ – राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या प्रलंबित मागण्या करिता मुंबई आझाद मैदानावर १आक्टोंबर २०२४ ला प्रचंड मोर्च्याचे आयोजन करण्यात आलेले आहे यासंदर्भात शासकीय विश्रामगृह चंद्रपूर व श्री. संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र वणी येथे (दि.२१ सप्टेंबर) शनिवारला आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत प्रदेश निरिक्षक गजानन भटकर, प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड, विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे, प्रदेशा उपाध्यक्ष(महिला आघाडी) समिक्षा भटवलकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विप्लव लांडगे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेश लिपटे यांनी मोठ्या प्रमाणात चर्मकार बांधवांनी मोर्चात सहभाग घेण्याचे आव्हान केले होते. त्याला प्रतिसाद देत चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य चर्मकार बांधव मिळेल ते वाहनाने मुंबईकडे प्रयाण करणे सुरू केले आहे. त्यामुळे मुंबई येथे चर्मकार बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी होणारा मोर्चा यशस्वी होईल; असे भाकीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी केले आहे.

