कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख 9860910063 – राहुल अलका गोरक्षनाथ लव्हाटे यांची महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क एक्साईज पोलीस या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष अनिल भाऊ रणवरे व इतर कार्यकर्ते यांनी निवडीबद्दल राहुल यांचा यथोचित सत्कार करून भावी वाटचालीसाठी प्रेरणा दिली. राहुल याची घरची परिस्थिती एकदम बिकट होती तसेच काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने पालन पोषणाची सर्व जबाबदारी आई व स्वतः राहुल वर येऊन बसली होती एवढ्या बिकट परिस्थितीला मात देत रोज आपल्या आई सोबत काम करून जे पैसे मिळत असेल त्यातून त्याचा उदरनिर्वाह व शिक्षण याचा कसाबसा खर्च चालत असे आपल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने चिकाटीने सराव करून भरती परीक्षेमध्ये उतरून स्वतः सिद्ध करून दाखवले कोपरगाव तालुक्यातून सर्वत्र त्याचावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

