भाकसखेडा येथील मुलींचा कबड्डी संघ विभागीय स्तरावर प्रथम..

0
77

संस्थेच्या वतीने विजय खेळाडूंचा भव्य सत्कार..

बळीराम लांडगे तालुका प्रतिनिधी उदगीर – उदगीर-(दि-०३) स्वामी दयानंद सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक ‌विद्यालय भाकसखेडा येथील १७ वर्षे वयोगटातील मुलींचा कबड्डी संघ विभागीय स्तरावर प्रथम काल ०२/१०/२०२४ रोजी धाराशिव येथे झालेल्या मुलींच्या विभागीय कबड्डी स्पर्धेत स्वामी दयानंद सरस्वती विद्यालयाचा संघ प्रथम येऊन या संघाची राज्यस्तरावर निवड झाली संघातील सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षकाचे परिसरात कौतुक केले जात आहे कै.निवृत्तीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ,भाकसखेडा चे अध्यक्ष-ॳॅड.बी.एन.बंडगर,उपाध्यक्ष- डॉ.डी.के.रुपनर,सचिव-पी.एन.बंडगर यावेळी सर्व पदाधिकारी तसेच प्राचार्य-प्रभाकर तांबे,क्रीडा शिक्षक रमाकांत गायकवाड,सहशिक्षक-राजेश कुमार काळे,विठ्ठल केदार,दशरथ कोळी,प्राध्यापक-अमित होळकर,परमेश्वर भालेराव,ज्ञानेश्वर वाडीकर,आनंद जाधव,शिवाजी रुपनर,अशोक सुरवसे,दत्तात्रय बुरले,शेषेराव हाके,संभाजी मोरे, प्रशिक्षक-बालाजी शेगसारे,सरपंच- अर्चना खेडकर,विकास सोसायटी चेअरमन-विवेक जाधव सर्व सदस्य केंद्रप्रमुख रमेश जाधव,केंद्रीय मुख्याध्यापक शेगसारे,बाजार समितीचे संचालक वसंत पाटील तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here