कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी रेणु पोवार – महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघटना कोल्हापूर जिल्हा शाखेच्या माध्यमातून विभागीय कार्यालय कोल्हापूर येथे दि. 4/10/2024 रोजी दुपारी 2.30 ते 3.30 पर्यत जळगाव येथील चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शविला.
यावेळी म.जी.प्रा. कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व लवकरात लवकर प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष मा. जयवंत घोरपडे, यांनी प्रास्ताविक मधून म. जी. प्रा.कर्मचारी यांच्या वर झालेल्या अन्यायाची इतमभूत माहिती विशद केली, त्यानंतर संघटनेचे दिवाण यांनी घोषणा घोषित करुन कर्मचारी यांच्या मध्ये जोश निर्माण केला त्या नंतर संघटनेचे विवीध नेते मा. उप अभियंता शिवाजी हरेर, संघटनेचे सचिव धनाजी चव्हाण यानी मनोगत व्यक्त करताना विविध प्रश्नांवर योग्य विचार करून महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर म.जी.प्रा. हे प्रश्न सोडवून कर्मचारी यांना न्याय द्यावा अन्यथा भविष्यात याच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या नंतर संघटनेचे संचालक चंद्रकांत गोपाळ नरके यांनी सर्वाचे आभार मानून संघटनेचे वरीष्ठ स्तरावर ज्या काही सुचना येथील त्या सुचणाचे पालन केले जाईल असे आश्वासन देऊन कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील म.जि.प्रा. कर्मचारी बहू संखेंने उपस्थित होते.
संपर्क 9158301077

