आजची कविता – जागर नारी शक्तीचा

0
213

तुझ्याच शक्तीचा जागर नारी
तुझ्याच शक्तीचा जागर ||धृ||

ओळख स्वतःला झाली होती तू चंडी
धरली होती हातात असूराची मुंडी
मार आता निर्भयाची मुसंडी ||1||

हृदयी तुझ्या मायेचा सागर वाही
तुझ्या प्रीतीला कुठे किनाराच नाही ||2||

नव्या युगाची नारी तू नारायणी
नव्या पिढीची तुझ्या हातात बांधणी ||3||

तूच आमची माय माउली
नराच्या आयुष्यातली लक्ष्मी तुझ्या पावली
तुझ्याच ठाई मायेची गार सावली ||4||

तुझ्याच शक्तीचा जागर नारी तुझ्याच शक्तीचाजागर ग ||

कवयित्री राणी भालेराव
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here