प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – महाराष्ट्र शासना द्वारा अनेक जनहिताय उपक्रम सुरु आहेत त्यात शिवभोजन थाळी वितरण खऱ्या अर्थाने जनहितकारी असल्याचे प्रतिपादन शिक्षिका प्रीती देवतळे यांनी केले. त्यांच्या हस्ते चंद्रपूरच्या प्रा डॉ.अंजुम द्वारा विजया दशमी निमित्याने स्वीट वाटप करताना त्या बोलत होत्या.
त्यापुढे असेही म्हणाल्या तुकूम परिसरातील स्पर्धा परिक्षा देणारे युवक व युवती द्वारा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी शासन सेवेत सेवा देत आहेत याबद्दल आनंद ही व्यक्त केला.
आनंद साव यांनी याप्रसंगी भोजन भांडी तर देवतळे परिवारानी ही आर्थिक सहकार्य दिले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजश्री शिंदे, सीमा दुपारे, देवराव कोंडेकर,खुशाल ठलाल यांनी सहयोग दिला.प्रा डॉ अजूम कुरेशी व साव आणि देवतळे परिवाराचे आभार श्रीराम पान्हेरकर यांनी मानले.

