भाजपा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवार दि. १८ ऑक्टोंबर २०२४ रोजी उमरखेड (जि. यवतमाळ) आणि वरोरा (जि. चंद्रपूर) येथे येत असून ते विधानसभा क्षेत्रातील भाजपा कार्यकर्त्यांशी बैठकीतून संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात सर्व प्रमुख नेते व भाजपा पदाधिकारी उपस्थित राहतील.
सकाळी ११.०० वा. उमरखेड येथील राजस्थानी भवन महागाव रोड येथे आयोजित उमरखेड विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
दुपारी ३.०० वा. वरोरा येथील आशीर्वाद मंगल कार्यालय, मिलन चौक येथे वरोरा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील व चर्चा करतील.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा उमरखेड व वरोरा दौरा महत्वाचा मानला जात आहे. त्यांच्या या दौऱ्यात उमरखेडचे आमदार नामदेव ससाणे, पुसद भाजपा जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे, चंद्रपूर ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर यांच्यासह दोन्ही विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

