चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांत एकही नामांकन दाखल नाही

0
79

दुस-या दिवशी विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल

भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर -दि. 23 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी आज (दि. 23) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही. तर बुधवारी इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या दुस-या दिवशी जिल्ह्यातील 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 23 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 16 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 48 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 24 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 27 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 36 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 174 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here