परळी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – परळी शहरातील दलितांच्या समस्या भुमित लाईट व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती साप्ताहिक मानपत्रेचे संपादक बालासाहेब जगतकर यांनी दिली असून नगरपालिकेचे आभार ही मानले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की 15 ऑगस्ट 2024 रोजी स्मशानभूमी येथील लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या व इतर मागणीसाठी आमरण उपोषण केले असता त्याची दखल म्हणून आज परळी नगरपालिकेने परळी शहरातील दलित स्मशानभूमीत 14 एलईडी लावण्यात आले असून व साफसफाई करण्यात आली आहे याबद्दल परळी नगरपालिकेने दखल घेऊन लाईटची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल परळी नगरपालिकेचे विद्युत विभागाचे श्री घुगे साहेब सचिन उपाडे इत्यादी सह त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते सोपानराव ताटेही उपस्थित असल्याची माहितीही साप्ताहिक मानपत्राचे संपादक बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.

