चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा दिनांक 19 ते 21 ऑक्टोबर 2024 श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी , पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. यात १७ वर्षा आतील मुली ज्योती राजेश कुमार बाला हिने वजन गट (-70) यात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन दाखवीत कास्यपदक पटकाविले.
संस्थेचे सचिव संतोष रतनलाल कडपेवाले, आणि संस्थेचे सर्व मान्यवरांनी खूप कौतुक केले. आणि यशाकरिता शुभेच्छा दिल्या.

