prabodhini news logo
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी विधानसभेत चक्रधर मेश्राम यांचे उमेदवारी अर्ज दाखल

ब्रम्हपुरी विधानसभेत चक्रधर मेश्राम यांचे उमेदवारी अर्ज दाखल

0
207

जनतेच्या आशिर्वादाने निवडुन येणार

ब्रम्हपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि.३०/१०/२०२४ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुक फारच प्रतिष्ठेची समजली जात असुन या निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत. चक्रधर मेश्राम यांना जन – जनवादी पार्टीच्या वतीने एबी फार्म देवून रिंगणात उतरविण्यात आले आहे. जनतेच्या हितासाठी आणि सेवेसाठी सदैव तत्पर असणारे उमेदवार चक्रधर मेश्राम यांनी आपले नामांकन शेवटच्या दिवशी दाखल केले. याप्रसंगी चक्रधर मेश्राम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष शपथविधी घेतली. नामांकन दाखल झाल्यानंतर त्यांनी जनतेच्या हितासाठी आणि सेवेसाठी सदैव तत्पर राहाणार असल्याचे सांगितले. जनतेच्या आशिर्वादामुळेच आपणाला ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात उभे राहाण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here