जिव लावला येवढा
मरे पर्यंत साथ दे ग आई
देह झिझवल आयुष्यार
नव्याने जन्म घेगं आई
तुझ्या कष्टाचे ऋण मरेपर्यंत संपणार नाही
अशी आभाळागत देण आहे तू..
झिझलीस सदैव कायम एकटी
आजही नाही कुणी सोबत संकटी
कर्म अनमोल तुझे उपकार साऱ्या जगवराती
आनंदाच्या अऋणे कौतुक तुझे करती
न संपनारी माया न संपनारे प्रेम ती एक आईच असते…
जगात कोणी तिच्यासारखं नसते…
खडतर वाटेवर स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ती असते…
आयुष्याच्या कढीन परिस्थितीवर मात करणारी ती एक जननी, माऊची असते.
कवयित्री प्रगती निमगडे
मुल चंद्रपूर जिल्हा

