बल्लारशाह – गोंदिया रेल्वे रुळावर महाकाय रानगव्याचा रेल्वे च्या अपघातात दुर्दैवी मृत्यू.

0
478

सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक चंद्रपूर- मृत्युंचा सापळा ठरत चाललेल्या बल्लारशाह- गोंदिया रेल्वे रुळावर पुन्हा एकदा महाकाय रानगव्याला रेल्वे अपघातात जीव गमवावा लागला आहे. यशवंतपूरम-कोरबा वैनगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस ने संध्याकाळी 6 च्या सुमारास, वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक 74 मध्ये,रानगव्याला जोरदार धडक दिल्याने, रानगवा बाजूला नाली मध्ये जाऊन फसला, झाडांवर आदळला, डावा पुढचा पाय अक्षरशः चुराळा झाला, एक शिंग तुटून रक्तस्त्राव झाला, रक्ताच्या अक्षरशः चिरकांड्या उडालेल्या होत्या, उठण्याचा प्रयत्न केल्याच्या खुणा आढळल्या, पण रानगव्याचा अखेर जागीच मृत्यू झाला, असा भयावह दृश्य पाहून सर्वांचाच जीव हळहळला.रानगव्याच वजन जवळपास 800 किलोच्या जवळपास असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी श्री. कुंदन पोडसेलवार यांनी सांगितले..
चांदा फोर्ट ते केळझर भागात 110 ची स्पीड ह्या रेल्वे रुळावर असते,यशवंतपूरम-कोरबा वैनगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस जवळपास 100 च्या वर स्पीड असावी वर ह्याच स्पीड मध्ये रानगव्याला धडक दिली असावी.
चंद्रपूर ते चिचपल्ली दरम्यान मागील दोन वर्षात 4 रानगव्याच्या रेल्वे अपघातात मृत्यूची नोंद हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी तर्फे दिनेश खाटे यांनी नोंदवली आहे,सोबतच वाघ, बिबट, अस्वल, हरीण, सांबर वर अनेक वन्यजीवांचा बल्लारशाह-गोंदिया रेल्वे रुळावर अपघातात मृत्यू झाला आहे.
रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेची गती संध्याकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत ५०-६० प्रति किलोमीटर ठेवण्याचे सुचविण्यात आले, फेब्रुवारीत महिन्यात सुद्धा मामला कक्ष क्रमांक ४१३ मध्ये रेल्वेच्या धडकेत रानगव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
बल्लारशाह- गोंदिया रेल्वे मार्ग, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या लगतच आहे, आणि वाघांचा भ्रमण मार्ग सुद्धा आहे, नव्याने घोषित झालेल्या कन्हाळगाव अभयारण्य आहे, कावल अभयारण्य, उमरेड- कऱ्हांडला अभयारण्य च्या भ्रमण मार्गात हा रेल्वे मार्ग येतो, हाच रेल्वे मार्ग पुढे, बालाघाट- नैनपूर मध्य प्रदेश, मधून जातो, पण तिथल्या रेल्वे प्रशासनाने वन्यजीवांसाठी उपाय योजना म्हणून अंडर पासेस, ओव्हर पासेस बांधण्यात आलेले आहे, मग महाराष्ट्रात रेल्वे प्रशासन कडून वन्यजीवांसाठी उपाय योजना का करण्यात आलेल्या नाही, आणखी किती वन्यजीवांचे बळी गेल्यावर रेल्वे प्रशासनाला जग येणार आहे, आणि वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी सुद्धा हा प्रश्नावर फक्त आम्ही उपाय योजण्या सुचविल्या, एवढयावर थांबून चालणार नाही आहे, समितीवर बसून प्रश्न सोडवू शकत नसेल तर, वन्यजीवांच्या संवर्धनासाठी बसलेल्या समितीवर बसून काहीही एक अर्थ नाही, अंमलबजावणी होण्यासाठी सर्व वन्यजीव संस्थांनी एकत्र येऊन हा प्रश सोडविला पाहिजे.
घटना स्थळी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे, अंकित बाकडे, नाजिश अली, राहुल चिलगिलवार, नौशाद सय्यद , जुबेर शेख, जुनोना वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आत्राम साहेब, पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. पोडसेलवार, वनरक्षक आढाव, वनरक्षक कांबळे, व वनविकास महामंडळाचे वनमजूर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here