प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – भारतीय बौद्धमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व अंतर्गत तालुका शाखा चिमुर अंतर्गत ग्राम शाखा गदगाव येथे समता सैनिक दलाचे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले , कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ राजपाल खोब्रागडे अध्यक्ष भारतीय बौध्दमाहासभा चंद्रपूर जिल्हा पुर्व तर अध्यक्ष म्हणून आद पितांबर खोब्रागडे उपाध्यक्ष सवरक्षण विभाग चिमुर मुख्य मार्गदर्शक आद अनिल मेश्राम मेजर तथा केंद्रीय शिक्षक, आद सिध्दार्थ बांबोळर डिव्हिजन आफिसर होते तर मुख्य अतिथी आद लोमेश खोब्रागडे सरचिटणीस आद घनश्याम भडके कोषाध्यक्ष आद आद लहुजी पाटील तालुका अध्यक्ष आद एन आर कांबळे जिल्हा संघटक आद जनार्दन खोब्रागडे जिल्हा संघटक, आद रामदास राऊत तालुका संघटक आद संजिवनी सातरडे केंद्रीय शिक्षिका, आद रामचंद्र गेडाम सचिव आद कृष्णा डांगे सचिव आद देवानंद शंभरकर अध्यक्ष बौद्ध समाज गदगाव आद चंदा गेडाम अध्यक्ष महिला मंडळ आद अनंता देवगडे अध्यक्ष समता सैनिक दल उपस्थित होते.
कार्यक्रमांची सुरुवात आदर्शाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली , शिबिराचे उद्घाटन ध्वजारोहण करून करण्यात आली नंतर सैनिकांना मार्गदर्शन व कवयात पथसंचलन, जनरल सलामी यांचे प्रशिक्षण देण्यात आले समता सैनिक दलाच्या शिबिरास ६० महिला , पुरुषानी सहभाग घेतला, दुसऱ्या दिवशी पुर्ण प्रशिक्षण देऊन समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे तर मुख्य मार्गदर्शक जनार्दन खोब्रागडे पितांबर खोब्रागडे देवानंद शंभरकर लहुजी पाटील अनिल मेश्राम सिध्दार्थ बांबोळर, अनंता देवगडे चंदा गेडाम उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमात सैनिकाचे मनोगत घेण्यात आले आद आम्रपाली शंभरकर ,विना शंभरकर आचल काळे यांनी मनोज वाळके यांनी आपल्या मनोगतात सैनिकाचे कर्तव्य पार पाडणार व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तत्पर राहणार असे आपल्याला मनोगतातून व्यक्त केले शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आद अनंता देवगडे, आद चंदा गेडाम, आद विना शंभरकर, आद कुंदा नागदेवते, आद आशा नागदेवते आद आम्रपाली शंभरकर, आद आचल काळे आद प्रतिभा काळे, आद आवळती शंभरकर आद कर्मिका मेश्राम यांनी सहकार्य केले.

