आजची कविता – दीपावली

0
49

दीपावली

दीपावलीच्या शुभ क्षणी,
स्वप्न सर्वांची साकार व्हावी.
सुखाच्या सागरात ,
बोट होऊन तरंगत रहावी.

शब्दसुमनाने आज ,
ओवाळते औक्षणाचे ताट.
मिळो सर्वांना सुखाची ,
प्रकाशमय वाट .

आयुष्यातील प्रत्येक क्षण ,
आनंद देऊन जावो .
नेहमी राहावे सुखी ,
दुःख कधी वाटायला न येवो.

सुखाची करून उधळण ,
स्वप्न सर्वांची पूर्ण व्हावी .
आजची दिपवाली ,
आनंदाची गोडी घेऊन यावी.

तुमच्या आमच्या प्रेमाची ज्योत,
अखंड तेजत राहावी .
हीच आमची इच्छा .
दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा .

कवयित्री – सौ. भारती वाघमारे
मंचर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here