विविध गावांतील काँग्रेस कार्यकर्त्यांशी साधला संवाद
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर – आगामी २० नोव्हेंबर रोजी राज्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील विविध गावातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत राज्यातील भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी काँग्रेस काळात झालेला विकास, नागरीकांना मिळालेल्या विवीध योजनांचा लाभ व संपुर्ण विकासाबाबत माहिती देऊन जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. अशातच काँग्रेस नेते, तथा राज्याचे विरोधी पक्षनेते , आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील उदापूर, निलज, पारडगाव, रणमोचन, रुई, बेटाळा, खरकाडा, पाचगाव येथील ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार काळात सत्ताधाऱ्यांकडून राज्याची तिजोरी लुटल्या गेली. आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने, विवीध प्रलोभने दाखवून जातकरणाच्या गुंत्यात गुरफटण्याचा रडीचा डाव, मनुवादी विचारांच्या भाजपवाल्यांनी सुरु केला आहे.यांच्या भूलथापा व खोटारड्या आमिषांना आपल्या विधानसभा क्षेत्रांतील नागरीकांना बळी न पडू देता गेल्या १० वर्षात मी खेचून आणलेला कोट्यावधींचा विकास निधी, पुर्णत्वास आलेली लोकउपयोगी विकास कामे, सामजिक कार्य, यांची इत्यंभूत माहिती व काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तसेच विकासात्मत विचार जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून राज्यातील भ्रष्ट सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी उपस्थीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
आयोजित बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, कृउबा संचालक किशोर राऊत, कृउबा संचालक सोनू मेश्राम, अॅड आशिष गोंडाणे, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, किसान काॅंग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष गुड्डु बगमारे, कृउबा संचालक दिवाकर मातेरे, कृउबा संचालक संजु राऊत, अण्णा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, निनाद गडे, अतुल राऊत, देवचंद ठाकरे, प्रा.चंद्रशेखर गणवीर, रविंद्र ढोरे, योगेश ढोरे, योगेश तुपट, विजय नाकतोडे, मंगेश दोनाडकर, विलास मेश्राम, पिंटू पिल्लेवान, दादाजी ढोरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

