prabodhini news logo
Home गडचिरोली जगाला हेवा वाटावा असे लक्ष्मीपूजन

जगाला हेवा वाटावा असे लक्ष्मीपूजन

0
292

गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज- दि.01 नोव्हेंबर 2024 स्थानिक शहरातील रामनगर वाॅर्डात राहणाऱ्या कृष्णकुमार निकोडे आणि परिवाराने काल लक्षमीपूजनाच्या दिवशी “प.पू.गुरूदेव हरदेव कृपानिवास या स्वगृही अनोख्या लक्ष्मीपूजनाचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे महिला हेच लक्ष्मीचे साकार व शाश्वत रूप समजून दोघींचा आदर सत्कार करण्यात आला. खरे लक्ष्मीपूजन आपण केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
दर सणासुदीला गडचिरोली येथे येऊन निकोडे बापलेकांना गोडधोड करून खावू घालणाऱ्या कृष्णकुमार निकोडे यांच्या देलोडा (बुज.) येथील सासूबाई अहिल्याबाई गुरनूले आणि धुणे-भांडी करणार्‍या कामवाल्या बाई रामनगर येथीलच भावनाताई भानारकर यांना निकोडे परिवाराने दोन दिवसापूर्वीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच्या जेवणाचे आमंत्रण दिले होते. काल शुक्रवार, दि.०१ नोव्हेंबरला सकाळी ९.०० वा. दोन्ही माऊल्या आल्यावर दोघींनाही सुसज्जित आसनावर बसविण्यात आले. कृष्णकुमार निकोडे आणि दुर्वांकुर निकोडे या बापलेकांनी दोन्ही माऊल्यांचे पवित्र चरण प्रक्षाळून पाद्यपूजा करत पुष्पांजली अर्पण केली. तद्नंतर दोघींनाही नवी साडीचोळी भेट देऊन चरणस्पर्श वंदन केले. यावेळी वैष्णव भानारकर, नाशिकेत गुरनूले उपस्थित होते. आजवर असे लक्ष्मीपूजन कोणीही केले नसल्याची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करतांना समाजसेवक, कवी व लेखक कृष्णकुमार निकोडे म्हणाले, “आपल्या संत निरंकारी मिशनच्या मानवताधर्मानुसार कोणीच उच्च-नीच नाही, सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत. स्त्री ही नारायणी-लक्ष्मी तर पुरुष हा नारायण-विष्णू आहे. उत्तम सेवा कार्य करणाऱ्या व्यक्तीचे हात व पायही सदैव पावन असतात, म्हणून अशाप्रकारे आपण पुरुष महिलांचा व महिला पुरुषांचा आदर-सत्कार, मान-सन्मान करू लागलो तर बालिका, माता आणि भगिनींवरील अन्याय-अत्याचार, हिंसाचार थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होतील, अशी एक सार्थ अपेक्षा आहे.” सर्वांचे जेवण आटोपल्यावर दुर्वांकुर निकोडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here