विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाऊबीजेच्या पर्वावर बहिणींशी संवाद
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि चंद्रपुर – राज्यातील महायुती सरकार काळात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच राज्यातील महीला भगिनींच्या समर्थनार्थ कठोर कायदे करून योग्य सुरक्षा पुरावीण्याऐवजी महायुती सरकारने सत्ताकाळात शासन तिजोरीवर डल्ला मारत सत्तेच्या मदमस्तीत जनतेला वाऱ्यावर सोडले. आता निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून आमच्या महिला भगिनींना “लाडकी बहीण’ म्हणून काही महिन्यांपूरते दीड हजार देऊ करत त्यांची मते वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला जात आहे. अशा हेकेखोर, स्वार्थी, लुटारु व राज्याची अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महाभ्रष्ट महायुतीला आता मतदानातून धडा शिकविणे काळाची गरज आहे.जर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली तर प्रतिमाह अडीच हजार रुपये दिले जाईल अशी ग्वाही राज्याचे विरोधी तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील मालडोंगरी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकी प्रसंगी भाऊबीज निमित्ताने उपस्थीत महिला भगिनिंशी संवाद साधला.
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझी आजवरची राजकीय कारकीर्द ही विकासासह, समाजकारण व जनसेवेसाठी समर्पित आहे. माझ्या विधानसभा क्षेत्रांतील महिला भगिनिंसाठी महीला बचत गट, उमेद कार्यकर्त्या आशा वर्कर, महीला गृहउद्योग, व इतर भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले. यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्पेट निर्मिती व इतर लघु रोजगारासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला. सोबतच ब्रम्हपुरी शहरात गारमेंट्स व्यवसायाला चालना देऊन भविष्यात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी माझी धडपड सुरू आहे.महायुती कडून “लाडकी बहीण’ हा केवळ निवडणूकी पुरता लॉलीपॉप असुन त्यांच्या खोट्या अमिषाला बळी पडू नका. आगामी काळात महाराष्ट्रात आमची सरकार येताच महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना २५०० प्रतिमाह लाभ देणार. सोबतच शाळकरी मुली, महीला यांना विशेष संरक्षण देणारे कठोर कायदे करून महिलांना सन्मानाने बिनधास्त जगण्यासाठी आधार देणार. देशाचे संविधान वाचवण्यासाठी आमच्या लढ्यात सहभागी होऊन आपण महाविकास आघाडीचा भाग व्हा. असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, कम्युनिस्ट पक्षाचे विनोद झोडगे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुरज मेश्राम, डॉ.नितीन उराडे, अनुसूचित जाती सेलचे प्रमोद मोटघरे, किसान काॅंग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, कृउबा किशोर राऊत, कृउबा अरुण अलोने, अतुल राऊत, संजु ठाकुर, प्रितीश बुरले, कृउबा उपसभापती सुनिता तिडके, माजी नगरसेविका अंजली उरकुडे, माजी नगरसेविका लता ठाकुर, अॅड आशिष गोंडाणे, पुष्पाकर बांगरे, प्रा.डि.के. मेश्राम, रवी मैंद, रवी पवार, सरपंच मंजुषा ठाकरे, गणेश घोरमोडे, अमीत कन्नाके, अण्णा ठाकरे, देवचंद ठाकरे, निनाद गडे, सतीश डांगे, वकार खान, सुरेश दुनेदार, राजेश तलमले, ब्रम्हदेव दिघोरे, सुरेश दर्वे, नामदेव लांजेवार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

