भंडारा जिल्हा प्रतिनिधी जयेंद्र चव्हाण 9665175674 – भंडारा- दूरदृष्टी ठेवून युवकांच्या विषयाला घेऊन काम करणाऱ्या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यशैलीचे असे प्रभाव पडले आहे कि शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्यांची रांग लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच कोणत्याही पक्षात नसणाऱ्या युवकांनी प्रवेश केला होता ही चर्चा संपत नाही कि आज नव मतदार युवकांनी आमदार भोंडेकर यांच्या कामांशी प्रभावित होवून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्य म्हणजे हे युवक राजकारणातील नसून येत्या २० तारखेला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणार आहेत.
येत्या २० नोव्हेंबर ला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार म्हणून अनेकांची नावे यादीत आली आहे. अश्यात ५० हून अधिक युवक आ.भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आणि आ.भोंडेकर यांची भेट घेतली. या दरम्यान सर्वांनी एक स्वरात आ.भोंडेकर यांच्या द्वारे युवकांच्या भविष्याकरिता केल्या जात असलेल्या कामांबद्दल विश्वास वर्तविला आणि पक्षात प्रवेश करीत असल्याचे सांगितले. यावेळी आ.भोंडेकर यांनी सर्व युवकांचे भगवा दुपट्टा घालून पक्षत स्वागत केले आणि उज्वल भविष्य करिता शुभेच्छा दिल्या.
प्रवेश घेणाऱ्या युवकांनी सांगितले कि या पूर्वी भंडारा क्षेत्राच्या आमदारांनी कधीच युवकांचा विचार केला नाही आणि विकास कामांच्या नावावर मतदारांची दिशाभूलच केली होती. परंतु विकास काय असते हे आ.भोंडेकर यांनी गेल्या अडीच वर्षातच दाखवून दिले. आणि आमदार भोंडेकर यांनी भंडारा विधानसभा क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकला आहे. आ.भोंडेकर यांच्या द्वारे मंजूर करून आणलेल्या विविध कामांमुळे जेथे भंडाऱ्याला जागतिक पातळीवर ओळख मिळणार आहे.तिथेच भविष्यात युवकांकरिता रोजगाराची संधी सुध्दा दिसून येत आहे. म्हणून आज या सर्व युवकांनी आपल्या जीवनातील प्रथम मत हे आ. नरेंद्र भोंडेकर यांनाच देण्याचे ठरविले आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

