नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिनांक ०२ नोव्हेंबर ते ०३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समूहाने खास भाऊबीजेच्या पवित्र सणाच्या दिवशी ” वेड्या बहिणीची वेडी माया” या विषयावर महाराष्ट्रातील जवळपास ९१ साहित्यिकांनी सहभाग नोंदवून आपल्या कवितेतून आणि लेखाच्या माध्यमातून विश्वातील भाऊ बहिणीचे नाते आणि एक अतूट नाते असलेला हा भाऊबीजेच्या दिवशी या विषयाला महाराष्ट्रातील साहित्यिकांनी बहीण भावाच्या अतूट प्रेमावर भरभरून लेखन केले. यात प्रामुख्याने ज्या कवींना बहीण नाहीत अशा कवींनी अतिशय ह्रदयाला हेलावून टाकणाऱ्या रचना सादर केल्या..यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी रचना ही कवी सीताराम नरके यांची होती..सदर कवीच्या रचनेचे वाचन करताना अक्षरशः अनेक साहित्यिकांचे डोळे पाणावले.सर्वात सहभाग नोंदविणारा साहित्य समूह म्हणून आज साहित्य दर्पण कला मंच नागपूर महाराष्ट्र या समूहाने नावलौकिक मिळविला आहे.कवयित्री कल्पना टेंभूर्णीकर यांची कविता सर्वोत्तम ठरली.कवी प्रा.नानाजी रामटेके यांची लाडकी बहिण हे शीर्षक असलेली कविता सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.कवयित्री रूपाली निखारे नागपूर यांची देखील रचना अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण तसेच प्रेरणादायी असल्याचे मत अनेक कवी कवयित्री यांनी आपल्या अभिप्रायातून व्यक्त केले आहे.
सहभागी सर्व लेखक कवी कवयित्री यांचे अभिनंदन समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर ,समूह संस्थापक प्रा.नानाजी रामटेके ,समूह प्रशासिका वैशाली खंडारे ,समूह निरिक्षिका माला मेश्राम ,समूह मार्गदर्शक डॉ.हरिश्चंद्र धिवार यांनी केले असून त्यांच्या पुढील साहित्यीक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केले.

