धुंद पावसात
तिची माझी भेट
नेत्राने बोलले
तिच्याशी मी थेट।।
जवळ ती आली
पाऊस होऊन
नकळत गेलो
तिच्यात पाहून।।
गड माथ्यावर
जराशी बसलो
शब्दांत मी तिच्या
उगीच फसलो।।
सभोवती रान
सुने सुने होते
सहवास तिचा
आता ही नव्हते।।
शोधू कुठे तिला
उमजले नाही
भेटीसाठी तिच्या
तळमळ होई।।
नाही कधी दिसे
स्वप्नातली परी
बेढब गाडगे
बसे माझ्या उरी।।
प्रा.समिंदर निवृत्तीराव शिंदे
लातूर

