सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक प्रबोधिनी न्युज, चंद्रपुर – येथील बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे भाजपा, शिवसेना, रिपाई (आठवले), पीरिपा (क़वाड़े) व मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ काल दिनांक 10/11/2024 रोज रविवारला सांय. 4:00 वा. उर्जानगर कोंडी वार्ड नं. 5 येथे भाजपा महिला महामंत्री केमाताई रायपुरे व शिवसेना तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी मा. सुधीर मुनगंटीवारांच्या पत्नी सपना यांची महिला सभा आयोजित करण्यात केली होती. या भव्य महिला सभेत सपना मुनगंटीवार बोलत असतांना सुधीरभाऊंनी मागील 30 वर्षापासून विरोधकांना कामातून उत्तर देवून विविध जनकल्याणकारी योजनेतून सर्व समावेशक कार्य केले, त्यामुळे जनतेने त्यांना विकासपुरुष ही पदवी बहाल केली.
असा उच्चशिक्षीत, अनुभवी, लोकनेता, विकासपुरुष सुधीरभाऊंना 72- बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातून भाजपा महायुतीची अधिकृत उमेदवारी मा. सुधीर मुनगंटीवारांना दिल्यामुळे त्यांना तिसऱ्यांदा बल्लारपुर विधानसभेतून महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचे आव्हान पत्नी सपना मुनगंटीवार यांनी केले.

