prabodhini news logo
Home ठळक बातम्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एटापल्ली तालुका सहसचिव कॉ. शरीफ शेख यांना श्रद्धांजली

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एटापल्ली तालुका सहसचिव कॉ. शरीफ शेख यांना श्रद्धांजली

0
177

एटापल्ली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एटापल्ली तालुका सहसचिव कॉ.शरीफ शेख यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्याच राहत्या घरी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पक्षासाठी आणि समाजासाठी एक मोठी हानी झाली आहे. कॉ. शरीफ शेख हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला.

या दु:खद प्रसंगी ऑल इंडिया किसान सभेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष कॉ. डॉ. महेश कोपुलवार, जिल्हा सचिव कॉ. देवराव चवळे, जिल्हा सहसचिव कॉ. ऍड. जगदीश मेश्राम, अहेरी विधानसभा प्रमुख कॉ. सचिन मोतकुरवार, एटापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लूरवार, कॉ. प्रकाश खोब्रागडे, कॉ. विशाल पूज्जलवार, कॉ. शुभम वनमवार, कॉ. आकाश तेलकुंतलवार यांसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि हितचिंतक अहेरी येथे त्यांच्या भावाच्या घरी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या.

कॉ. शरीफ शेख यांचा समर्पणभाव, प्रामाणिकपणा आणि पक्षासाठीची कामगिरी कायम प्रेरणादायी राहील. *त्यांचं अंतिम पार्थिव दर्शन उद्या सका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here