
निवडणूक आली जवळ
वाहते वारे निवडणुकीचे
प्रचार चाले जोरात
वाभाडे निघाले एकमेकांचे
चालली चढाओढ
एकमेकांचे पाय खेचण्यास
झाले वाटप पैशाचे
घेतले विकत मतदारास
सत्तेसाठी खोटे आश्वासन
सारा खेळ सत्तेचा
हाती सत्ता आल्यास
विचार ना जनतेचा
कार्यकर्ता वणवण फिरे
त्यास, नाही उसंत जेवणाची
त्याच्याच जोरावर नेत्यास
अपेक्षा निवडणूक जिंकण्याची
कवयित्री रेखा डायस
गोवा














