तुझी नी माझी कहाणी एक झाली
पाचशेच्या नोटाने माझी बोलती बंद केली….
निवडून द्यावा म्हणतो भ्रष्टमुक्त उमेदवार
पण दारूच्या बाटलीने वाचा बंद केली….
आई, ताई, काकूंना मतदान करण्यास सांगतो
त्या मटणाच्या बोटीत साधी दाळ बंद झाली….
जाईन म्हणतो मी पण मतदान करायला
त्या नेत्यांच्या बियरने गल्ली धुंद झाली….
मतदार म्हणून मी फक्त नावापूरते झालो
कोणीतरी म्हणे माझ्या नावावर मंदी आली….!
कवी पुनाजी ना.कोटरंगे
सावली

