चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – विद्ये विणा मती गेली ! मती विणा निती गेली ! निती विणा गती गेली ! गती विणा वित्त गेले ! एवढे अनर्थ एका अविद्येने केले, असा मुल मंत्र देणारे समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांना यांच्या १३४ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन….
भारतीय जनता पक्ष महानगर जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी लोकनेते सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात महात्मा ज्योतीबा फुले पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.
महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेळ रोहणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजविणारे, बहुजनांचे उध्दारक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या विचाराला व कार्याला विनम्र अभिवादन ….
या प्रसंगी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे, मंडळ अध्यक्ष रवी लोनकर, संदिप आगलावे, दिनकर सोमलकर, शिला चव्हाण, माया उईके, शितल गुरनुले, चंद्रकला सोयाम, कल्पना बगुलकर, शितल आत्राम, सारिका संदुरकर, महेश झिटे, शुभम गेडाम, प्रलय सरकार, विनोद शेरकी, बाळू कोलनकर, संजय तिवारी, रोशन गिरडकर, अमर धिराल, प्रमोद डोर्लीकर, आनंद मांदाडे, दशरथ सोनकुसरे, मधुकर राऊत, रितेश वर्मा, अतुल रायकुंडलीया यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

